यशस्वी एज्युकेशन सोसायटीतर्फे
प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

यशस्वी एज्युकेशन सोसायटीतर्फे प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

पिंपरी, ता. १६ ः यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स आयआयएमएसच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येणार आहे. बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन बीबीए व बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन बीसीए या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी ही मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे. शुक्रवारी (ता.१७) आणि शनिवारी (ता.१८) सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ऑनलाइन स्वरूपात ही कार्यशाळा होणार आहे. प्रवेश परीक्षेसाठीचे संभाव्य प्रश्न व तज्ज्ञांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत देण्यात येणार आहे, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com