जीआयएस स्कूलमध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण मोहीम

जीआयएस स्कूलमध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण मोहीम

पिंपरी, ता. ११ ः चिखली येथील एस.एस.पी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या जीआयएस स्कूल व जीआयएस प्लेस्कूलच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून शाळेचा परिसर हरितमय व पर्यावरण पूरक केला. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक विविध भाषणे दिली आणि गीते गायली. याप्रसंगी मुख्याध्यापिका शिल्पा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. धनश्री पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष एस. बी. पाटील, विश्वस्त गणेश पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रकाश गायकवाड, सहयोगी संचालक सुनील शेवाळे, जीआयएस प्लेस्कूलच्या मुख्याध्यापिका भारती गडद, उपमुख्याध्यापिका प्रीती खंडेलवाल, पर्यवेक्षिका माधुरी येवले, क्रीडा पर्यवेक्षक विनोद जगदाळे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com