Pune News : जुनी सांगवीतील भाजी मंडई झाली प्लास्टिक मुक्त

शहरातील पहिली प्लास्टिक मुक्त भाजी मंडई
environment vegetable market in old Sangvi plastic free pune
environment vegetable market in old Sangvi plastic free punesakal

जुनी सांगवी : प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम व प्लास्टिक मुक्त शहराच्या ध्येयपूर्तीसाठी जुनी सांगवी येथील भाजी विक्रेत्यांनी शंभर टक्के प्लास्टिक मुक्त भाजी मंडईचे यशस्वी अभियान राबवत भाजी मंडई प्लास्टिक मुक्त केली आहे. बेसिक्स संस्थेच्या पुढाकाराने येथील भाजी मंडई प्लास्टिक मुक्त झाली आहे.

या भाजी मंडईत कोणताही भाजीविक्रेता ग्राहकांना प्लास्टिक बॅग देत नाही.सर्वांनी कागदी बॅगमध्येच भाजी व फळे दिले जातात.बेसिक्स संस्थेचे अधिकारी विशाल मिठे व त्यांच्या टीमच्या प्रयत्नामुळे येथे येणारे सर्वच ग्राहक घरुनच कापडी पिशव्या घेऊन येत आहेत.

बेसिक्स संस्थेच्या प्रयत्नातुन आज ही मंडई पुर्णपणे प्लास्टिकमुक्त झाली आहे. गेली दोन वर्षांपासून शहरात प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. प्रबोधन, जनजागृतीमुळे नागरिकांच्या मनात प्लास्टिक मुक्तीची भावना रूजविण्यासाठी या मंडई मधून वेळोवेळी जनजागृती करण्यात आली.

याचाच परिणाम म्हणून येथे येणारा प्रत्येक ग्राहक कापडी पिशवी घेऊनच येतो. व भाजी विक्रेतेही भाजी घेण्याआधी भाजी विक्रेत्याला कापडी पिशवी जवळ आणली आहे का अशी विचारणा करतात.नसेल तर भाजी मंडईतच विक्रिसाठी असलेल्या कापडी पिशव्या ग्राहकाला घ्याव्या लागतात.यामुळे कापडी पिशव्या विक्रीलाही मदत होत आहे.पाच ते दहा रुपयाला मिळणारी कापडी पिशवीचा भुर्दंडही नको म्हणून ग्राहकही आता घरातूनच कापडी पिशव्या जवळ आणत असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

गेली दोन वर्षांपासून कोणताही भाजी विक्रेता या भाजी मंडईत प्लास्टिक पिशव्या बाळगत नाही.नागरीकांनाही याची आता सवय झाली आहे.

- शिवाजी शिंदे भाजी विक्रेते.

कोट- गेल्या वर्षभरापासुन येथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला प्लास्टिकचे दुष्परिणाम समजावुन सांगितले.सर्व विक्रेत्यांनां कापडी पिशव्यांचे महत्व समजावुन सांगितले.याचाच परिणाम आज ही भाजी मंडई शहरातील एकमेव प्लास्टिकमुक्त भाजी मंडई झाली आहे.

- विशाल मिठे,बेसिक्स संस्था अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com