
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) एक नोव्हेंबरपासून साथीच्या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
पिंपरी : साथीच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. डेंगी, मलेरिया व चिकुनगुणिया या आजारांमध्ये नोव्हेंबरपासून वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी त्वरित लक्षणे दिसल्यास उपचारासाठी तपासण्या करून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) एक नोव्हेंबरपासून साथीच्या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. ताप, पुरळ किंवा लाल चट्टे, सांधे दुखी सारखी डेंग्यूसदृश्य लक्षणे दिसल्यास त्वरित 'एनएसवन' व 'आयजीजीएम' तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर चिकुणगुणिया असल्यास ताप, अंगदुखी, सांधे दुखणे लक्षणे आढळल्यास त्वरित दवाखान्यात उपचारासाठी जाणे गरजेचे आहे. डासांच्या प्रादुर्भावापासून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. मलेरियामध्ये 'व्हायवॅक्स' हा आजार जास्त तीव्रतेने आढळून येतो. मलेरिया एकदा झाला तरीही पुन्हा होऊ शकतो. हे सर्व आजार श्वेतपेशींवर हल्ला करतात. त्यामुळे अशक्तपणा वाढतो. प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घेतल्यास सर्व उपचारांवर इलाज शक्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर कालावधीत वायसीएममध्ये दाखल रुग्ण
प्रमुख कारणे
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सध्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती, प्रबोधनपर माहिती देणे, सांडपाणी हटविणे, ड्राय डे करणे, मलेरिया इन्सपेक्टरकडून जागोजागी माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
- डॉ. प्रवीण सोनी, प्राध्यापक व औषध विभाग प्रमुख