Pimpri : जिल्हा रुग्णालयात ईपिलेप्सी आजार व उपचार माहीती शिबिर संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा रुग्णालयात ईपिलेप्सी आजार व उपचार माहीती शिबिर संपन्न

जिल्हा रुग्णालयात ईपिलेप्सी आजार व उपचार माहीती शिबिर संपन्न

जुनी सांगवी : राष्ट्रीय आरोग्य मिशन महाराष्ट्र राज्य व ईपिलेप्सी फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रूग्णालय औंध पुणे येथे ईपिलेप्सी फिट अपसमार आजाराबाबत माहीती व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . यासंबंधीत शिबिरात डॉक्टर व ईतर सहकारी कर्मचा-यांकरीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात येऊन त्या मध्ये ईपिलेप्सी संबंधी माहिती जनजागृती उपचार व आरोग्य शिक्षण व समुपदेशन संबंधी माहितीतज्ञ डॉ. सुजित जगताप डॉ.मुदस्सर डॉ. सुर्या निर्मल व सहका-यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरूवात ज्येष्ठ न्युरोफिजिशियन डॉ.हेमंत संत, डॉ. निर्मल सुर्या संस्थापक ईपिलेप्सी फाऊंडेशन मुंबई, डॉ. अशोक नांदापुरकर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिपप्रज्वलन करून केली. शिबिरात सुमारे २५० रूग्णांचे तपासणी करून त्यापैकी ३२ रूग्णांचे ईसीजी,एक रुग्णाचा सिटीस्कॅन, एमआयआर चाचण्या करण्यात आल्या. रूग्णांना औषधोपचार देऊन गरजु पैकी १७ रूग्णांना भौतिकउपचार , २७ रूग्णांना वाचा उपचार , १६ जनांना परीपूर्ण समुपदेशन करण्यात आले . डॉ. अशोक नांदापुरकर जिल्हा शल्यचिकित्सक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.संतोष देशपांडे वैद्यकिय अधिकारी बाह्य संपर्क, डॉ.वर्षा डोईफोडे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.प्रकाश रोकडे जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील परीसेविका ,अधिपरीचारीका, रुग्णालयीन विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

loading image
go to top