Employee State Insurance
Sakal
पिंपरी-चिंचवड
Pimpri News : ‘ईएसआय’ लाभांमध्ये आस्थापनांची आडकाठी, जनजागृतीचाही अभाव; लाखो कामगार वंचित
Pimpri MIDC : पिंपरी एमआयडीसीतील अनेक कंपन्या ईएसआय योजनांची माहिती कामगारांपर्यंत पोहोचवण्यास आणि निधी जमा करण्यास उदासीन असून लाखो कामगार लाभापासून वंचित होत आहेत.
अमोल शित्रे
पिंपरी : एमआयडीसीतील कंपन्या, व्यावसायिक आस्थापना आणि उद्योगांमध्ये जाऊन कामगारांना योजनांची माहिती देणे ही ईएसआय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र, काही आस्थापनांकडून त्यात आडकाठी निर्माण केली जात आहे; तर काही आस्थापना प्रतिसादच देत नसल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. तसेच बरेच उद्योग व व्यावसायिक ‘ईएसआय’ निधी सरकारकडे जमा करण्यास टाळाटाळ करतात. तसेच खर्च वाचविण्यासाठी पळवाटा शोधत आहेत. त्यामुळे, देखील पिंपरी चिंचवडसह लगतच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणारे लाखो कामगार योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत.