‘ब्रेथ ॲनालायझर’द्वारे 
दीड हजार चालकांची तपासणी

‘ब्रेथ ॲनालायझर’द्वारे दीड हजार चालकांची तपासणी

पिंपरी, ता. २३ : रस्ते अपघात टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) पाऊल उचलले आहे. चालकांची ‘ब्रेथ ॲनालायझर’द्वारे तपासणी केली जात आहे. अडीच वर्षात कार्यालयाच्या वतीने दीड हजार चालकांची तपासणी केली आहे. यामध्ये केवळ एकच वाहनचालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे आढळून आल्याची माहिती आरटीओच्या वतीने देण्यात आली.

आरटीओकडून विविध महामार्गांवर जादा वेग, सीटबेल्ट नसणे, ओव्हरलोड, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते. तसेच ‘ब्रेथ ॲनालायझर’द्वारे तपासणी करून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई केली जाते. शहरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून, यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शहरात दररोज सरासरी दोन जणांचा अपघातात मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे किंवा मानवी चुकांमुळेही अपघात होत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिस, आरटीओ आणि महामार्ग पोलिसांकडून कारवाई केली जाते.

पिंपरी-चिंचवड आरटीओने जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२४ दरम्यान १ हजार ४५५ वाहन चालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली. यात केवळ एकच बसचालक दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे आढळून आले. अवजड सामानाची वाहतूक करणारे वाहनचालक सर्रास दारू पिऊन वाहन चालवताना दिसून येते. पण, आरटीओकडून केलेल्या कारवाईत केवळ एकच वाहनचालक ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’प्रकरणी दोषी आढळल्याची नोंद आहे.
---------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com