हिंजवडीतील रस्ते खोदल्याने वाहतुक झाली जीवघेणी | Hinjewadi Road | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंजवडीतील रस्ते खोदल्याने वाहतुक झाली जीवघेणी
हिंजवडीतील रस्ते खोदल्याने वाहतुक झाली जीवघेणी

हिंजवडीतील रस्ते खोदल्याने वाहतुक झाली जीवघेणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाकड - हिंजवडी आयटी नगरीत विकासकामांच्या नावाखाली पर्यायाने महामेट्रोच्या रस्ता बांधणीसाठी मुख्य रस्ते उच्चदाब विद्युत वाहनी टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले. मात्र, दीड वर्ष होऊनही मेट्रोचे काम केवळ बॅरिगेट्स लावून रस्ता अडविण्यापुढे जाऊ शकले नाही त्यामुळे आहे ते रस्ते अरुंद आणि धोकादायक झाल्याने आयटीतील वाहतुकीचा पुन्हा एकदा बोजवारा उडाला आहे.

शुक्रवारी (ता. १९) भाजपाने देखील रखडलेले हींजवडी मेट्रोचे काम त्वरित सूरु करावे या मागणीसाठी पुण्यात आंदोलन केले आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षात लॉकडाऊन काळात हिंजवडीतील रस्ते अथवा किमान मेट्रोचे काम संपून जगभर बदनाम झालेले आयटीतील ट्रॅफिकचे ग्रहण प्रशासनाकडून सोडविले जाईल अशी अपेक्षा आयटी अभियंत्यांसह स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी यासह सर्वांनाच होती मात्र सर्वांची मोठी अपेक्षा भंग झाली आहे.

हेही वाचा: अबब... पोलिस शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी १ लाख ८९ हजार ७३२ अर्ज

मेट्रोच्या कामासाठी एकीकडे बॅरिगेट्स तर दुसरीकडे जीवघेणा खड्डा असे जीवघेणे चित्र सध्या आयटीत आहे. त्यामुळे हिंजवडीच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहे. हिंजवडीतील शिवाजी चौक ते फेज थ्री पर्यत किमान ५ किमी अंतराच्या रस्त्याच्या दुभाजकालगत मेट्रोच्या कामासाठी बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे रास्ता कमालिचा अरुंद झाला आहे. मात्र लॉकडाऊन काळात ट्रॅफिक नसताना अद्याप या कामाचा शुभारंभ न केल्याने सध्या सर्वच स्तरात प्रचंड नाराजी आहे.

सरकारला मेट्रोचे काम लगेच करता येत नसेल तर बॅरिगेट्स लावून रस्ता का अडविण्यात आला?

केवळ नागरिकांच्या दिखाव्यासाठी अन समाधानासाठी ही बनावट खटाटोप सुरू आहे. मुख्य वर्दळीच्या रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. एमआयडीसी व पीएमआरडीए प्रशासनाने ही दोन्ही कामे पूर्ण करावीत अन्यथा मेट्रोची बॅरिगेट्स काढून टाकावीत.

- प्रदीप साखरे, संस्थापक युवा शक्ती प्रतिष्ठान

loading image
go to top