चिंचवडगावातील रस्त्यांवर खोदकामामुळे राडारोडा; कामे संथगतीने सुरू असल्याचा नगरसेवक शेडगे यांचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

चिंचवड गावठाण प्रभाग क्रमांक 18 मध्ये हेरिटेज प्रकल्पांतर्गत गेल्या तीन महिन्यांपासून कामे सुरू आहेत.

पिंपरी : चिंचवड गावठाण प्रभाग क्रमांक 18 मध्ये हेरिटेज प्रकल्पांतर्गत गेल्या तीन महिन्यांपासून कामे सुरू आहेत. संथगतीने सुरू असलेल्या कामाचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याने काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नगरसेवक मोरेश्‍वर शेडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शेडगे यांच्यासह सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भारतीय जनता पक्षाचे प्रभाग अध्यक्ष मिथून बोरगांव, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय शाळिग्राम, युवा मोर्चाचे सरचिटणीस अजित कुलथे, युवाप्रभाग अध्यक्ष अनिकेत पायगुडे, केदार बावळे आदींनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, हेरिटेज प्रकल्पांतर्गत सिमेंट रस्ते, स्टोर्म वॉटर व ड्रेनेज लाईनसाठी खोदाई केली आहे. गावठाणात सर्वत्र खड्डे, चिखल व राडारोडा झाला आहे. विजवाहिन्या व नळजोड तुटले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कामांना विरोध नाही, मात्र, विलंब होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ही कामे त्वरित पूर्ण करावीत. जिजाऊ पर्यटन स्थळ, क्रांतिवीर चापेकर वाडा, राम मंदिर, गणेश पेठ, पुराणिक वाडा, समाधी मंदिर परिसर, पवनानगर, रस्टन कॉलनी आदी ठिकाणी खोदकाम केले आहे. 'या प्रकल्पाशी संबंधित सर्व विभाग व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काम लवकर पूर्ण करू', असे आश्‍वासन आयुक्तांनी दिल्याचे शेडगे यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excavations on roads in Chinchwadgaon