- राहुल हातोले
पिंपरी - गॅस सिलिंडरचे तुटलेले वायसर किंवा फुटलेले-गंजलेले सिलिंडर, मुदत संपलेल्या सिलिंडरमुळे होणारी गॅस गळती ही गंभीर बाब आहे. ती अपघातास कारणीभूत ठरू शकते. दरम्यान, शहरात सध्या अशा कालबाह्य सिलिंडरचे वितरण होत असल्याचे समोर आले आहे. गॅस वितरण कंपन्यांनी आणि विशेषत: ग्राहकांनी या प्रकाराबाबत सजग राहणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.