पिंपरीत महाविद्यालयांमधील कोविड सेंटर बंद करण्याबाबत मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

शहरातील महाविद्यालयातील हॉस्टेलमधील सीसीसी सेंटर 31 ऑगस्टरअखरे बंद करण्यात येणार होते. परंतु रूग्णसंख्या पाहता बंद करणे शक्‍य नसल्याने 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. 

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने "कोविड केअर' सेंटरसाठी महाविद्यालयांच्या इमारती, हॉस्टेल ताब्यात घेतल्या आहेत. सरकारकडून शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे टप्प्या-टप्याने शहरातील महाविद्यालयातील हॉस्टेलमधील सीसीसी सेंटर 31 ऑगस्टरअखरे बंद करण्यात येणार होते. परंतु रूग्णसंख्या पाहता बंद करणे शक्‍य नसल्याने 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेकडून ताथवडेतील बालाजी लॉ कॉलेज, पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शाहूनगरमधील रिजनल टेलीकॉम सेंटर, किवळेतील सिम्बायोसिस कॉलेज हॉस्टेल, रावेतमधील डॉ. डी. वाय. पाटील मुलींचे, मोशीतील सामाजिक न्याय विभागाचे मुले व मुलींचे वसतीगृह, ताथवडेतील इंदिरा कॉलेज हॉस्टेल, संत तुकारामनगरमधील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक कॉलेज हॉस्टेल, म्हाळुंगेतील म्हाडा वसाहत, मोशीतील आदिवासी विभाग मुलांचे व मुलींच्या हॉस्टेलमध्ये कोविड केअर सेंटर (सीसीसी) उभारले होते. या सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या परंतु काहीच लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यांचे विलगीकरण करण्यात आले होते, त्यांना दोनवेळच्या आहारासह विविध सुविधा दिला आहेत.

हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त

दरम्यान महापालिकेने सरकारच्या माध्यमातून शहरातील विविध भागात जम्बो रुग्णालय व रुग्णालयात कोविड केंद्रांची उभारणी केली आहे. तसेच या महिन्याच्या अखेरीस शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा सरकारचा मानस आहे. रुग्णसंख्या देखील आटोक्‍यात येईल. त्यामुळे शहरातील महाविद्यालयातील हॉस्टेलमधील सीसीसी सेंटर 31 ऑगस्टअखेर बंद करण्यात येणार होती. परंतु परिस्थिती पाहता, इतक्‍यात सीसीसी सेंटर बंद करणे शक्‍य नसल्याने त्याला 31 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असल्याची माहिती भूमी व जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी महेश कोळप यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension to Covid Care Center in Pimpri till September 30