esakal | गौरी-गणपती सणानिमित्त कोकणात जादा गाड्या
sakal

बोलून बातमी शोधा

ST

गौरी-गणपती सणानिमित्त कोकणात जादा गाड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गौरी-गणपती सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी भोसरी, दिघी, कळस, विश्रांतवाडी, येरवडा तसेच इतर ठिकाणांहून ग्रुप बुकिंग करून जाणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागामार्फत ४४ प्रवाशांचा ग्रुप उपलब्ध झाल्यास जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे. सहा ते नऊ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत एकूण ३४ गाड्या प्रवाशांसाठी वल्लभनगर आगारातून कोकण मार्गाकडे धावणार आहेत.

गणपती उत्सवासाठी चिपळूणसाठी नऊ , दापोलीसाठी दोन, देवरुखसाठी पाच, गुहागरसाठी सहा, कासेसाठी एक, खेडसाठी चार, महाडसाठी एक, व रत्नागिरीसाठी सहा गाड्या पिंपरी चिंचवड आगारातून सुटणार आहेत. गाड्यांचे आरक्षण स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, पुणे स्टेशन या स्थानकांवरून संगणकीय आरक्षणाद्वारे उपलब्ध होणार आहे. यासाठी ई-पासची आवश्यकता भासणार नाही. ग्रुप बुकींगला १५ दिवसांपासून सुरुवात झाली आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिकीट दर नेहमीप्रमाणे स्थिर आहेत. ज्येष्ठांना पन्नास टक्के सवलत आहे. मास्क व सॅनिटायझरचे नियम पाळणे बंधनकारक आहे. सुरक्षित प्रवासाची हमी एसटी महामंडळाकडून देण्यात आल्याचे वल्लभनगर स्थानक प्रमुखांनी सांगितले.

हेही वाचा: ठाण्यातील घटनेवरून बारामतीत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

१ सप्टेंबरपासून चिपळूण व तिवरेसाठी गाडी सुटणार आहे. एमएसआरटीसी वरून बुकिंग करता येईल. दिघी, भोसरी, कळस, विश्रांतवाडी, येरवडा मार्गे तिवरे व चिपळूणसाठी शिवशाही फेरी सुरू करण्यात आली आहे. आगाऊ आरक्षणाची सोय आहे. तिवरे गाडी येताना ८.३० वाजता व चिपळूण येताना ३.३० या वेळेत सुटणार आहे.

हेही वाचा: ग्रामीण मार्गांवरील बसमार्गामुळे प्रवास सुखकर

आरक्षण वेळा जाताना -

पिंपरी-चिंचवड ते तिवरे :

पिंपरी-चिंचवड : रात्री ८.३०, भोसरी : ८.३५, दिघी : ८.४५, कळस ९., विश्रांतवाडी : ९.१०, येरवडा ९.१५

पिंपरी चिंचवड ते चिपळूण :

पिंपरी-चिंचवड : ६.३०, भोसरी : ६.३५, दिघी : ६.४५, कळस : ७.००, विश्रांतवाडी : ७.१०, येरवडा : ७.१५

या वेळेत सुटणार वल्लभनगर आगारातून गाड्या

  • चिपळूण : सकाळी - ७.१, ९.३१, रात्री - ९.३१, १०.१, ९.१, ९.३१, ९.४१, ९.११

  • दापोली : रात्री ९.१, ९.३१

  • देवरुख : रात्री ९.१, ९.२१, ९.३१, ९.१, ९.११

  • गुहागर : रात्री ९.४१, १०.१, १०.११, १०.५१, ९.५१, १०.११

  • कासे : रात्री ९.१६

  • खेड : रात्री १०.१, १०.११, १०.३१, १०.२१

  • महाड : सकाळी ८.१

  • रत्नागिरी : रात्री ८.३४, ८.४६, ८.५१, ८.५६, ९.१, ८

loading image
go to top