Education News
Sakal
पिंपरी-चिंचवड
Education News : महाविद्यालय तपासणीला मनुष्यबळाअभावी ‘खो’, पालकांनी तक्रारी केल्यास कारवाई; शिक्षण विभागाचा पवित्रा
NEET-JEE Scam : इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला असून, बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पिंपरी : ‘‘कोचिंग क्लास व कनिष्ठ महाविद्यालय एकत्रित असलेल्या म्हणजे ‘इंटिग्रेटेड’ संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नका,’’ असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करून या प्रकारांवर अंकुश ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, गेल्या वर्षी फक्त पाच महाविद्यालयांविरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे तक्रारी आल्या आहेत. त्यावर अधिकाऱ्यांनी तपासणीचा निर्णय घेतला. पण, अपुऱ्या मनुष्यबळामुळे ही तपासणी इशाऱ्यापुरतीच राहिली आहे.

