esakal | बनावट कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट बनवणाऱ्या चौघांना अटक

बोलून बातमी शोधा

corona testing

प्रवासी नागरिकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे बनावट रिपोर्ट बनवून देणाऱ्या चौघांवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

बनावट कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट बनवणाऱ्या चौघांना अटक

sakal_logo
By
सूरज यादव

पिंपरी - प्रवासी नागरिकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे बनावट रिपोर्ट बनवून देणाऱ्या चौघांवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वाकड येथे उघडकीस आला. पत्ताराम केसारामजी देवासी (वय ३३, रा. भुमकर वस्ती, वाकड), राकेशकुमार बस्तीराम वैष्णव (वय २५, रा. धनकवडी, पुणे), चिरंजीव (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही), राजू भाटी (रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिस हवालदार कुणाल शिंदे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड येथील शनी मंदिराजवळ एक टोळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र पुरवत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी ( ता. १९) सायंकाळी पाचच्या सुमारास कारवाई केली.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा नवीन आदेश

आरोपी राकेशकुमार वैष्णव हा बनावट कोरोना रिपोर्ट बनवून व्हाट्स अपवर पाठवत होता. हे रिपोर्ट वाकड येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना प्रवाशांच्या मागणीनुसार दिले जात होते. रिपोर्टवर लाइफनीटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड बावधन या लॅबचे बनावट लेटरहेड आणि डॉक्टरांचे बनावट सह्या व शिक्के आरोपी नमूद करीत होते. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.