esakal | आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट
sakal

बोलून बातमी शोधा

Laxman Jagtap

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या नावे फेसबुक अकाऊंट (Facebook Account) तयार करण्यात आले आहे. त्यावरून पैशांचीही मागणी केली. (Fake Facebook Account Name of MLA Laxman Jagtap)

याबाबत जगताप यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय तुंगार यांनी सांगितले की, ''आमदार जगताप यांच्या नावे कोणीतरी बनावट फेसबुक अकाउंट तयार केले असून त्यावरून पैशांचीही मागणी केली. हे खाते तातडीने बंद केले आहे. अधिक तपास सुरु आहे''.

हेही वाचा: लोणावळा-खंडाळ्यात २४ तासात १७५ मिमी पावसाची नोंद

दरम्यान, जगताप यांनीही याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बनावट फेसबुक अकाऊंटवरून वैयक्तिक मेसेज पाठवून पैशाची किंवा इतर वस्तुंची मागणी केली जात आहे. अशा पोस्टला कोणीही प्रतिसाद देऊ नये.

loading image