esakal | लोणावळा-खंडाळ्यात २४ तासात १७५ मिमी पावसाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळा-खंडाळ्यात २४ तासात १७५ मिमी पावसाची नोंद

लोणावळा-खंडाळ्यात २४ तासात १७५ मिमी पावसाची नोंद

sakal_logo
By
भाऊ म्हसाळकर

लोणावळा : लोणावळा-खंडाळ्यात गेले अनेक दिवस ओढ दिलेल्या पावसाने रविवारी व सोमवारी दमदार हजेरी लावली. दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने परिसरातील ओढे-नाले, डोंगर-दऱ्यांतील धबधबे खळाळून वाहू लागले आहेत. इंद्रायणी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, दोन दिवस जोरदार पाऊस सुरू असल्याने रविवारी सकाळी आठपर्यंत १७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

लोणावळा परिसरातील अनेक सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते. पाऊस सुरू असल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूकही संथ गतीने सुरू होती. पुणे-मुंबई महामार्गालगत कुमार रिसॉर्ट, मावळी पुतळा, ट्रायोज मॉल, भांगरवाडी, वळवण, नांगरगाव, नाझर कॉर्नर, ब्रदीविशाल सोसायटी, तुंगार्ली आदी भागांत पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. खंडाळा, कार्ला, वेहेरगाव, कुसगाव बु., औंढे-औंढोली आदी भागातही पावसाने तडाखा दिला.

हेही वाचा: सासवड : संत सोपानदेव पंढरीकडे मार्गस्थ

जून महिन्याचा शेवट आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस लांबला होता. शेतकऱ्यांची भात लावणीची कामे रखडली होती. त्यामूळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण होते. मागील दोन-तीन दिवसात तालुक्‍याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस भात पिकासाठी अतिशय उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

loading image