पोलिस आयुक्तांच्या नावाने उघडले बनावट फेसबुक खाते 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत असतात.  दरम्यान, आता तर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याच नावाचे बनावट फेसबुक खाते उघडल्याचे समोर आले आहे. ​

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांच्या नावाने उघडले बनावट फेसबुक खाते उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून लोकांकडे पैसे मागितल्याचेही उघडकीस आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे 
 क्लिक करा

फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत असतात.  दरम्यान, आता तर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याच नावाचे बनावट फेसबुक खाते उघडल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस पाय पसरत असलेले सायबर गुन्हेगार थेट पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावानेही फेसबूकवर अनेक अकाऊंट आहेत. त्यामुळे आणखी अशाप्रकारची नेमकी किती खाती आहेत, याचा शोध घेतला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake Facebook account opened in the name of the Commissioner of Police