fake website
sakal
पिंपरी - नागरिकांना बनावट चलन पाठवले जात असल्याच्या तक्रारी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाकडे आल्या आहेत. तर, काही सायबर गुन्हेगार ‘आरटीओ’च्या नावे बनावट संकेतस्थळ, फसवे ॲप पाठवत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. ‘आरटीओ’च्या नावे येणाऱ्या मेसेज, ॲपबाबत शंका असल्यास नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.