esakal | सासऱ्याचा सूनेवर लैंगिक अत्याचार, कोंबडीचं रक्त प्यायला लावलं
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

सासऱ्याचा सूनेवर लैंगिक अत्याचार, कोंबडीचं रक्त प्यायला लावलं

sakal_logo
By
सुधीर काकडे

मुंबईतील साकीनाकामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पून्हा एकदा समोर आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर आणखी एक काळीज लाजीर्वाणी घटना समोर आली आहे. सुनेचा लैंगिक छळ करत, कोंबडीचे रक्त प्यायला लावल्याची विचित्र घटना समोर आली आहे. एका स्वयंघोषित साधूच्या सांगण्यावरुन सासऱ्यांकडून हा सर्व प्रकार समोर आल्याचे समजते आहे. पुण्याच्या भोसरी पोलिस स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोंबडीचे रक्त प्यायला सांगणारा सासरा आणि पतीविरोधात या ३३ वर्षीय महिलेने पोलिसात धाव घेतली आहे. पती नपुंसक असल्याची माहिती सासरकडच्यांनी आपल्यापासून लपवल्याची माहिती पिडीतेने दिली आहे. तसेच जेव्हा आपल्याला पतीच्या नपुंसकतेबद्दल कळले तेव्हा आपण नातेवाईकांना याबद्दल सांगितले. त्यानंतर सासरच्या लोकांनी आपल्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा: सात दिवसात पिंपरीत सहा जणांची हत्या...; पाहा व्हिडिओ

दरम्यान, या घटनेतील पिडीता गेल्या चार महिन्यांपासून पतीपासून वेगळे राहत आहे. तक्रारीमध्ये केलेल्या सर्व आरोपांची चौकशी करण्यात येणार असून, या प्रकरणात आम्ही दोघांना अटक केली असल्याची माहिती, भोसरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली आहे.

loading image
go to top