

Dog menace rising daily at Talegaon
sakal
तळेगाव स्टेशन : तळेगाव शहरात रात्री अपरात्री रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना भटक्या श्वानांची अधिक धास्ती लागली आहे. झुंडीने फिरणारे हे श्वान नागरिकांच्या अंगावर धावून येतात, पाठलाग करतात. गल्लीबोळांत मुक्त संचार असलेल्या या श्वानांमुळे नागरिकांना भीतीच्या सावटाखाली वावरावे लागत आहे.