
डॉक्टरकडे महिला सहायक पोलिस निरीक्षकेने पाच लाखांची लाच मागितली.
दोन लाखांची लाच घेताना महिला सहायक पोलिस निरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात
पिंपरी - रुग्णालयाचे सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी डॉक्टरकडे महिला सहायक पोलिस निरीक्षकेने पाच लाखांची लाच मागितली. यातील दोन लाखांची रक्कम स्वीकारताना या अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई निगडी येथील खासगी रुग्णालयात करण्यात आली.
सिंधदुर्ग येथील महिला अत्याचार निवारण कक्षाच्या सहायक पोलिस निरीक्षक नलिनी शंकर शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ६२ वर्षीय महिला डॉक्टरने तक्रार दिली आहे. शिंदे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांवये दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास शिंदे यांच्याकडे आहे. या तपासासाठी त्या निगडी येथे आल्या होत्या.
दरम्यान, यातील तक्रारदार महिला यांच्या रुग्णालयाचे सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी व गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी शिंदे यांनी त्यांच्याकडे पाच लाखांची लाच मागितली. तडजोडीअंती दोन लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
Web Title: Female Assistant Police Inspector Caught Taking Bribe Of Rupees 2 Lakh Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..