धक्कादायक! वायसीएम रुग्णालयाच्या शौचालयात सापडले मृत नवजात अर्भक   

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 19 December 2020

वायसीएम रुग्णालयातील जनरल ओपीडी अकरा नंबरच्या समोर महिलांसाठी शौचालय आहे. येथे शुक्रवारी (ता.19) दुपारी दीडच्या सुमारास सफाई कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शौचालयाच्या भांड्यात स्त्री जातीचे अर्भक दिसून आले.

पिंपरी: पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) शौचालयात स्त्री जातीचे मृत अर्भक सापडले. हे अर्भक कोणी टाकले याचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी बीव्हीजी कंपनीचे सुपरवायझर सुधीर तुकाराम शिर्के (रा.ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. 

वायसीएम रुग्णालयातील जनरल ओपीडी अकरा नंबरच्या समोर महिलांसाठी शौचालय आहे. येथे शुक्रवारी (ता.19) दुपारी दीडच्या सुमारास सफाई कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शौचालयाच्या भांड्यात स्त्री जातीचे अर्भक दिसून आले.

दरोड्याच्या गुन्ह्यात सहा आरोपींना दहा लाखांचा दंड, आठ वर्ष तुरुंगवास

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अर्भकाला ताब्यात घेऊन तपासणी केली असता ते अर्भक स्त्री जातीचे असून मृत्यू झाल्याचे समोर आले. 
पुरावा नष्ट करण्यासाठी हे अर्भक येथे टाकले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहेत. यासह रुग्णालयातील कर्मचारी यांच्याकडूनही माहिती घेतली जात आहे. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: female newborn baby founded dead in YCM Hospital toilet Pimpri Chinchwad