
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सूरज असगर चौधरी (वय 21, रा. त्रिवेणीनगर, सेक्टर क्रमांक 22, ओटास्कीम, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. जून ते 4 डिसेंबर 2020 या कालावधीत आरोपी व फिर्यादी हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. याकाळात त्यांच्यातील अश्लील फोटो आरोपीने मोबाईलमध्ये काढून घेतले. त्यानंतर हे फोटो फिर्यादीचे पती व चिंचवड विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्यांना व्हायरल करेल, अशी वारंवार धमकी देऊन फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच आरोपी सूरज याने त्याचे अपहरण, मारहाण करीत खंडणी मागितल्याप्रकरणी यातील फिर्यादी महिला पोलिसासह त्यांच्या साथीदारांविरोधात वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. सूरज याचे अपहरण करून खंडणीपोटी किडनी मागितल्याचे त्याने फिर्यादीत म्हटलेले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सूरजकडून घेतलेले पैसे देण्याचे आमिष दाखवून महिला पोलिसाने पुण्यातील नातेवाईक पोलिस शिपाई, तिची आई आणि अन्य चार जणांसोबत मिळून सूरजचे अपहरण केले. इंदापूर जवळील जंगलात नेऊन त्याला मारहाण केली. सूरजचे व पोलिस महिलेचे फोटो आणि व्हिडीओचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मोबाईल फोडून टाकला. आरोपींनी त्याच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी अथवा किडनी मागितल्याचे सूरजने फिर्यादीत म्हटले आहे.