कॉंग्रेस शहराध्यक्षाबाबत पिंपरी-चिंचवडमध्ये उत्सुकता; पंधरा इच्छुकांनी दिल्या मुलाखती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

पंधरा इच्छुकांनी दिल्या मुलाखती; शक्तिप्रदर्शनामुळे कार्यालयासमोर मोठी गर्दी 

पिंपरी : राष्ट्रीय कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी मंगळवारी तब्बल पंधरा इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. प्रत्येकाने केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती. पक्ष निरीक्षक कोणाचे नाव पुढे पाठविणार आणि प्रदेश समितीकडून कोणाच्या नावाच्या मोहोर उमटणार याविषयी कार्यकर्त्यांत उत्सुकता निर्माण झाली आहे. सचिन साठे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

प्रदेश सरचिटणीस व पिंपरी-चिंचवडचे पक्ष निरीक्षक राजेश शर्मा आणि नाशिक शहर अध्यक्ष शरद आहेर यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम झाला. इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह सकाळपासूनच कार्यालयात आले होते. आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळावी, यासाठी समर्थक सतत घोषणा देत असल्याने परिसर दुमदुमून गेला. यावेळी इच्छुक उमेदवारांना विविध प्रश्‍न विचारून त्यांची मते आजमावून घेतली. आता या बाबतचा अहवाल प्रदेश समितीकडे पाठविण्यात येणार आहे. यानंतर मुंबईहून अध्यक्षपदाची घोषणा होईल. दरम्यान, कोणाला पद मिळणार याची उत्सुकता इच्छुकांसह समर्थकांना लागली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महापालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते कैलास कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते संदेश नवले, दिलीप पांढारकर, एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, पिंपरी विधानसभा किसान कॉंग्रेस सभा अध्यक्ष सरिता जामनिक, असंघटित कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, माजी शहर युवक अध्यक्ष सचिन कोंढरे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, अशोक काळभोर, रामचंद्र माने, आबासाहेब खराडे, सुदाम ढोरे, रवी खन्ना यांच्यासह पंधरा इच्छुकांनी निरीक्षकांशी संपर्क करून इच्छा व्यक्त केली असल्याने अध्यक्ष निवडताना कसरत करावी लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यांची होती उपस्थिती 
माजी महापौर कविचंद भेट, अल्पसंख्याकचे राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, रोहित शेळके, युवक कॉंग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयूआयचे शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, मयूर जयस्वाल, श्‍याम आगरवाल, भाऊसाहेब मुगुटमल, विश्‍वास खंडाळे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, अभिमन्यू दहितुले, उमेश बनसोडे, हिराचंद जाधव, संदेश बोर्डे, नासीर चौधरी, अमर नाणेकर, रोहन गायकवाड, नितीन डेविड अशा कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

शक्तीप्रदर्शन 
दिलीप पांढरकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन शक्तीप्रदर्शन केले. पक्षाचा झेंडा, पोस्टर आणि त्यांच्या नावाचा उल्लेख असलेले टी शर्ट घातलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तीन फुटाचा पुष्पगुच्छ पक्ष निरीक्षकांना भेट म्हणून दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fifteen aspirants for the post of city president of the national congress were interviewed on tuesday