esakal | पिंपरी : पन्नास वर्षांचा बंधारा धोकादायक
sakal

बोलून बातमी शोधा

pimpale gurav

पिंपरी : पन्नास वर्षांचा बंधारा धोकादायक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळे गुरव : पुणे (Pune) व पिंपरी-चिंचवड (pimpri chinchawad) या शहरांना जोडणाऱ्या बालेवाडी (balewadi) ते पिंपळे निलख चौंधे लॉन्स मार्गावरील बंधाऱ्याला पन्नास वर्षे झाली आहेत. मात्र, त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने तो धोकादायक बनला आहे. १९७१ साली बांधलेल्या या बंधाऱ्याचा मुख्य उद्देश पाणी अडवण्यासाठी होता. परंतु, आता शहरीकरण झाल्यामुळे बऱ्याच वर्षांपासून आता पाणी अडवले जात नाही. बंधारा मजबुतीकरण पुणे की पिंपरी-चिंचवड महापालिका की पाटबंधारे खाते करणार हा वादाचा मुद्दा आहे. (Fifty year old dam is dangerous)

हेही वाचा: टेक्नो फोन्स, 20000 खालील मोबाईल फोन्स

पिंपळे निलख ते बालेवाडी अशी दुहेरी वाहतूक बंधाऱ्यावरून होते. आता पूर्वीच्या तुलनेत वाहतूक कितीतरी पटींनी अधिक वाढली आहे. तसेच वयोमानानुसार बंधाऱ्याला तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी झाडीझुडुपे उगवलेली आहेत. काँक्रिट निखळल्यामुळे आतील लोखंडी गज बाहेर आले आहेत. बऱ्याच ठिकाणी बंधाऱ्याचा भाग जमिनीपासूनच खराब झाला आहे. जुने बांधकाम असल्याने ते बऱ्याच ठिकाणी उखडले आहे. वाहनांतून जाताना बंधाऱ्यावर हादरे जाणवतात. त्यामुळे वाहने आणि पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणाहून नागरिक आणि विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या या बंधाऱ्यांची पाहणी करून योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

हेही वाचा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस - IMD

पर्याय नसल्याने या बंधाऱ्यावरून चारचाकी, दुचाकी, तीनचाकी वाहतूकही सुरू आहे. बंधारा बांधला तेव्हा एवढी वाहतूक आणि वजन नक्कीच विचारात घेतलेले नसणार. शिवाय तो आता हा बंधारा जुना झाला आहे. त्यामुळे त्याच्या मजबुती करणाचा विचार गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे.

  • काँक्रीट निखळून गज बाहेर

  • पादचारी मार्गाची दुरवस्था

  • जुने बांधकाम उखडले

  • मजबुतीकरणाची आवश्यकता

loading image