भोसरीनंतर आता पिंपरीत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

  • अजमेरा कॉलनीत ट्रान्सफॉर्मरला आग 

पिंपरी : अजमेरा-मासुळकर कॉलनीत ट्रान्सफॉर्मरला ऑइल गळतीमुळे शुक्रवारी (ता. 25) दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागली. आग लागल्याने स्फोट झाला. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा तीन तासांसाठी खंडित झाला होता. अग्निशमन दलाची गाडी तत्काळ दाखल झाल्याने अर्ध्या तासात आग नियंत्रणात आली. 

पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो विस्तारीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात 

शहरातील महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये आधीच राग आहे. त्यात आठवडाभरापासून महावितरणकडून दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्याचा परिणाम "वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामावर होत आहे. दिवसातून तीन ते चार तास वीज नसल्याने नागरिक संतापले आहेत. वाढीव बिलामुळेही त्रासले आहेत. त्यात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अजमेरा कॉलनीतील महावितरणच्या एका ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आग लागली. स्फोटामुळे ट्रान्सफॉर्मरमधील तेल रस्त्याच्या कडेला लांबपर्यंत उडाले. रस्त्यावर एकही नागरिक नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरातील वीजपुरवठा तीन तास खंडित होता. सायंकाळपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू होते. लिकेज नव्हते, पण बुशिंग फुटल्याचे महावितरणचे सहाय्यक अभियंता भारती यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भोसरीतील घटना ताजी असतानाच... 

15 दिवसांपूर्वी भोसरी-इंद्रायणीनगरमधील ट्रान्सफॉर्मर स्फोटात कोतवाल कुटुंब उद्‌ध्वस्त झाले. ही घटना ताजी असतानाच अजमेरा कॉलनीतील ट्रान्सफॉर्मरमधील बुशिंग फुटल्याने ऑइल गळतीमुळे अचानक पेट घेतला. मोठी आग लागल्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाले. प्रसंगावधानामुळे कर्मचारी थोडक्‍यात बचावले. महावितरण दुर्लक्ष करत असल्यामुळे असे स्फोट घडत आहे. 

स्थानिक रहिवासी म्हणताहेत... 

सागर पवार : आग मोठी होती. दुपारची वेळ असल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही. 

विशाल मासुळकर : भोसरीमधील घटना नुकतीच घडली आहे. आता महावितरण प्रशासनाने काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा जीवीतहानी होऊ शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire at transformer in ajmera colony pimpri