
पिंपरी : अल्पवयीन मावस बहिणींचं अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
करण भैरवनाथ साबळे (वय 21), आशिष आनंद सरोदे (वय 20), निवास संजय सुतार (वय 20), तेजस राजू वाघमारे (वय 19), कार्तिक ऊर्फ टिंक्या राजकुमार चव्हाण (वय 21, सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. मंगळवारी (ता. 15) रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी आशिष सरोदे याने फिर्यादी मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच, करण साबळे याने फिर्यादीच्या मावस बहिणीशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर साबळे व सरोदे यांनी इतर आरोपींना बोलावून त्या दोन्ही मुलींना जबरदस्तीने एका मोटारीत बसवून चिंचवड स्टेशन येथे घेऊन गेले. तेथे आरोपींनी पहाटे पाच वाजेपर्यंत मुलींना आपल्या ताब्यात ठेवले.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, तेथून पीडित मुली स्वत:ची सुटका करून घेत घरी आल्या. नातेवाइकांना सर्व हकिगत सांगितल्यानंतर नातेवाइकांनी निगडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पाचही आरोपींना चार तासातच जेरबंद केले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, आशिष याला सात दिवसांची, तर करण याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच, इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.