पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विरोधी पक्षनेता कोण? राष्ट्रवादीकडून हे पाच जण इच्छुक 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

पिंपरी-चिंचवड महापालिका विरोधी पक्ष नेते नाना काटे यांचा एक वर्षांचा कालावधी संपला आहे. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? राजकीय गोटाचे लक्ष लागले आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका विरोधी पक्ष नेते नाना काटे यांचा एक वर्षांचा कालावधी संपला आहे. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? राजकीय गोटाचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने इच्छुक नगरसेवकांकडून अर्ज मागविले होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजता अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, राजू मिसाळ, संतोष कोकणे, विनोद नढे व नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक नगरसेवकांकडून अर्ज मागविले होते. आगामी महापालिका निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला तोडीस तोड उत्तरे देणाऱ्या नगरसेवकाला विरोधी पक्षनेतेपदाची संधी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मिळण्याची शक्‍यता आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेची निवडणूक 2017 मध्ये झाली. त्या वेळी 128 पैकी 77 उमेदवार निवडून आणत भारतीय जनता पक्षाने सत्ता ताब्यात घेतली. तर गेले पंधरा वर्ष सत्ता हाती असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ 36 उमेदवार निवडून आणता आले. त्यांना विरोधी पक्ष नेतेपदावर समाधान मानावे लागले. 

पर्यटकांनो, लोणावळेकरांचं हे ऐका  

यापूर्वी म्हणजेच 2017 मध्ये महापालिका निवडणूक झाल्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर योगेश बहल यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सोपविली. त्यानंतर चिखलीतील ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने (दिवंगत) यांनी एक वर्ष समर्थपणे विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांचा एक वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर नाना काटे यांना संधी देण्यात आली. आता त्यांच्यानंतर कोण? याची उत्सकुता सर्वांना लागली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिकेची आगामी निवडणूक होण्यास दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. या काळात दोन नगरसेवकांना विरोधी पक्ष नेतेपदाची संधी देण्याची रचना राष्ट्रवादीने केली आहे. त्यापैकी आतापासून सुरू होणाऱ्या एक वर्षांच्या कालावधीसाठी पाच जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आलेल्या अर्जांबाबत पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक होईल. त्यात विरोधी पक्ष नेतेपदासाठी नाव निश्‍चित केले जाईल. त्याबाबतचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले जाईल. त्यांच्या मार्फत महापालिकेला कळवून सर्वसाधारण सभेत महापौर विरोधी पक्ष नेत्याचे नाव जाहीर करतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five aspirants from ncp for Leader of Opposition in pimpri chinchwad municipal corporation