पिंपरीत पुन्हा भरदिवसा घरफोडी; पावणे पाच लाखांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने घरातील पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास केला.

पिंपरी : दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने घरातील पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास केला. पिंपरीतील मोरवाडी येथे भरदिवसा ही घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सॅमसंग बेजामिन शेफर्ड (रा. अनुग्रह को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी, म्हाडा, संत तुकाराम नगर, मोरवाडी) यांनी फिर्याद दिली. शुक्रवारी (ता. 9) दुपारी दीड ते साडेपाच यावेळेत फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी तोंडाला मास्क बांधलेले दोन अनोळखी चोरटे दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात शिरले. बेडरूममधील दोन्ही कपाटे कशाच्या तरी सहाय्याने उचकटून त्यातील रोख रक्कम व घरफोडी, असा एकूण चार लाख 64 हजारांचा ऐवज लंपास केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही घटना सायंकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यासह नागरिकांकडे चौकशी करून आरोपींचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five lakh burglary in pimpri crime news