Talegaon News : तळेगाव आगाराच्या नवीन ५ लालपरी बसचे लोकार्पण
New Buses : तळेगाव दाभाडे एसटी आगारात रविवारी पाच नवीन लालपरी बस दाखल झाल्या असून, आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते पूजन करून त्यांचे लोकार्पण करण्यात आले.
तळेगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव दाभाडे आगारात रविवारी (ता.१८) पाच नवीन लालपरी बस दाखल झाल्या.प्राप्त झालेल्या नवीन लालपरी बसेसचे लोकार्पण रविवारी (ता.१८) सकाळी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते पूजा करुन करण्यात आले.