पिंपरी : 'म्यूकरमायकोसिस'वरील इंजेक्शनची काळ्या बाजाराने विक्री

crime
crimesakal media

पिंपरी : म्यूकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी एका परिचारिकेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने वाकड येथे केली.

crime
पिंपरी-चिंचवडमध्ये आज २२४ नवीन रुग्ण; पाच रुग्णांचा मृत्यू

गौरव जयवंत जगताप (वय ३१, रा. काळाखडक रोड, वाकड), अमोल अशोक मांजरेकर (वय ३९, रा. सूसरोड, पाषाण), गणेश काका कोतमे (वय ३२, रा. जनता वसाहत, पुणे), ममता देवरावजी जळीत (वय २४, रा. ज्ञानदीप शाळेजवळ, रुपीनगर), प्रदीप बाळासाहेब लोंढे (वय ३५, रा. राजेवाडी झोपडपट्टी, नाना पेठ, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. बसवराज (पूर्ण नाव, पत्ता समजू शकला नाही) याच्यावरही गुन्हा दाखल झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. औषध निरीक्षक भाग्यश्री अभिराम यादव यांनी फिर्याद दिली आहे. म्यूकरमायकोसिसवर वापरण्यात येणारे डी लिपोसोमोल एमफोटेरिसियिन-बी हे सात हजार ८१४ रुपयांचे इंजेक्शन काळ्या बाजारात २१ हजाराला तर बिवेसिझुम्ब हे ५४ हजारांचे इंजेक्शन ६५ हजारांला विकण्यासाठी काहीजण वाकड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी (ता. ७) दुपारी पावणे एकच्या सुमारास काळाखडकरोड येथे सापळा रचून चार जणांना जेरबंद केले.

crime
दिलासा! पुणे जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या हजारच्या आत

आरोपी गौरव याचे वाकड येथे गौरव मेडीकल स्टोअर्स आहे. तर अमोल हा पाषाण येथील गणेश मेडीकलचा सेल्समन असून, त्याला या व्यवहारापोटी ८ हजार ५०० रुपये मिळणार होते. गणेश हा कसबा पेठेतील युनिव्हर्सल रुग्णालयात बाऊन्सर असून, त्याला सहा हजार पाचशे रुपये कमिशन मिळणार होते. तर, ममता ही मोशी कोविड सेंटरमध्ये परिचारिका असून, तिला २६ हजार रुपये कमिशन मिळणार होते. तिने तिच्या मित्राकडून तीन इंजेक्शन मागविले आहेत. लोंढे हा प्राप्ती मेडीकल स्टोअर्सचा मालक असून, तो ५४ हजारांचे इंजेक्शन ६५ हजार रुपये चढ्या दराने विक्री करताना सापडला. या सर्व आरोपींकडून डी लिपोसोमोल एमफोटेरिसियिन-बी हे तीन इंजेक्शन तर बिवेसिझुम्ब हे एक इंजेक्शन जप्त केले. त्यांच्यावर फसवणूक, विनापरवाना, छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने औषध विक्री करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com