मावळ : धामणेत मृत्यू झालेल्या महिलेच्या संपर्कातील 'ते' पॉझिटिव्ह, इतर गावांसाठी हा धोक्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

धामणे येथील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा शनिवारी (ता. २७) मृत्यू झाला होता.

बेबडओहोळ (ता. मावळ) : धामणे येथील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा शनिवारी (ता. २७) मृत्यू झाला होता. तिच्या संपर्कातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, दोन मुलांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने धामणे गावातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या इतर गावांना धोक्याचा इशारा देणारी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

धामणे गावातील २८ वर्षीय महिलेस कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने तिची कोरोना तपासणी करण्यात आली होती. तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शनिवारी महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबातील सात जणांना तपासणीसाठी तळेगाव येथील कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. त्यातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दोन लहान मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यातील पाच जणांना कुठलेही प्राथमिक लक्षणे नसताना देखील अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आढले बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी दिलीप सुर्यवंशी यांनी सांगितले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पवन मावळातील धामणे हे मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. इतर गावांशी जास्त संपर्क व जाणे येणे नसल्याने गाव अलिप्त आहे. तरीसुद्धा कोरोनाचा या गावातील प्रवेश इतर गावांना धोक्याचा इशारा देणारी आहे.
 गावातील सर्व लोकांनी घाबरून न जाता आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. जे कोणी बाधितांच्या संपर्कात आले असतील, त्यांनी तत्पर आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन धामणे ग्रामपंचायतीकडून गावात करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five people were found corona positive in dhamne maval