Corona Updates : मावळात पाच हजार रुग्णांची कोरोनावर मात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात ५० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात ५० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ५ हजार ५०२ झाली आहे. आतापर्यंत १८५ जणांचा मृत्यू झाला असून, ५ हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुरूवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ५० जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १६, गहुंजे येथील १२, वडगाव येथील आठ, लोणावळा, तळेगाव दाभाडे ग्रामीण व इंदोरी येथील प्रत्येकी सहा, सोमाटणे येथील दोन, गहुंजे, माळवाडी, येळसे, कार्ला, टाकवे खुर्द व पाचाणे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार ५०२ झाली असून, त्यात ४७३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २२२ लक्षणे असलेले व २५१ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २२२ जणांपैकी १९६ जणांमध्ये सौम्य व २५ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. एक जण गंभीर आहे. सध्या सक्रिय असलेल्या ४७३ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five thousand patients overcome corona in maval