
आळंदी- पुणे पालखी मार्गावर महापालिकेने उभारलेल्या दिशादर्शक फलकांवर राजकारण्यांनी स्वतःचे जाहिरात फलक लावले आहेत.
आळंदी-पुणे मार्गावर दिशादर्शकांवर फ्लेक्सचे अतिक्रमण
पिंपरी - आळंदी- पुणे (Alandi Pune Route) पालखी मार्गावर महापालिकेने (Municipal) उभारलेल्या दिशादर्शक फलकांवर (Board) राजकारण्यांनी स्वतःचे जाहिरात फलक (Flex) लावले आहेत. त्यामुळे आळंदीला जाणाऱ्या व पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकांवरील दिशादर्शक झाकले गेले असून वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
महापालिकेने चऱ्होलीतील चोविसावाडी काटे कॉलनी पासून दिघीगाव दत्तनगरपर्यंत पालखी मार्गाचे आठपदरीकरण केले आहे. या मार्गाच्या मधोमध बीआरटी मार्ग आहे. दोन्ही बाजूला सेवा रस्ता आहे. मुख्य मार्गावर आवश्यक ठिकाणी आडवे दिशादर्शक फलक लावलेले आहेत.
कुठे आहेत दिशादर्शक पुण्याकडे जाणारा मार्ग
चऱ्होली फाटा, जिल्हा बॅंकेच्या शाखेसमोर
मॅग्झिन कॉर्नर चौकाजवळ दिघी
आळंदीकडे जाणारा मार्ग
मॅग्झिन कॉर्नर चौकाजवळ दिघी
वडमुखवाडी, गोखले मळ्याच्या पुढे
चऱ्होली फाटा, कोकण किनारा हॉटेल समोर
नागरिक म्हणतात...
आळंदी-पुणे पालखी मार्गावर लावलेले दिशादर्शक देवदर्शनाला येणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत होते. रस्त्याबाबत कोणाला विचारायची गरज नव्हती. पण, गेल्या सहा महिन्यांपासून जाहिरात फलक लावले जात असल्याने विद्रुपीकरण वाढले आहे. दिशादर्शक फलकांचा काहीच उपयोग होत नाही. त्यांच्यावर कार्यवाही करावी व फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी, असे वडमुखवाडीतील एका नागरिकाने सांगितले.
Web Title: Flex Encroachment On Directional Signs On Alandi Pune Route
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..