esakal | गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांचे भाव कडाडले; पिंपरी-चिंचवडमधील आजचा भाव जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांचे भाव कडाडले; पिंपरी-चिंचवडमधील आजचा भाव जाणून घ्या

गणेशोत्सवात बाप्पाला वेगवेगळ्या फुलांचा हार घालण्यासाठी फूल मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांचे भाव कडाडले; पिंपरी-चिंचवडमधील आजचा भाव जाणून घ्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गणेशोत्सवात बाप्पाला वेगवेगळ्या फुलांचा हार घालण्यासाठी फूल मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. किलोच्या स्वरूपात फुलांची खरेदी केली जात असून, यंदा झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी आहे. मात्र, झेंडूचे भाव कडाडले आहेत. गतवर्षी 120 रुपये किलोपर्यंत स्थिरावलेला झेंडूचा भाव यंदा दुपटीपेक्षा वाढून 250 रुपये किलो एवढा झाला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर कोरोना आणि महापुरामुळे शहरातील बाजारात येणाऱ्या झेंडूची आवकच 70 टक्‍क्‍यांनी घटली आहे. एकूणच मुबलक फुले उपलब्ध नसल्याने फुलांचे भाव कडाडले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहर परिसरात झेंडूची आवक अधिक असून, ती जुन्नर, खेड, चऱ्होली, मावळ, सातारा, आणि बंगलोर या परिसरातून होते. त्यासाठीची लागवड प्रामुख्याने जून-जुलैच्या दरम्यान केली जाते. परंतु, यंदा लॉकडाउनमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा फुलांची लागवड केली नाही. त्यात भर म्हणजे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये केलेल्या लागवडीला महापूराचा फटका बसला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी येणाऱ्या गौरींसाठी फुलांचा हार, वेणी, गजरा, पूजेसाठी फुलांची खरेदी करण्यात येते. त्यामुळे बाजारात फुलांची मागणी वाढली आहे. साधारणपणे गणेशोत्सवाच्या आधी बाजारात झेंडूची आवक वाढू लागते. पण त्याचवेळी मागणीदेखील वाढत असल्याने चढ्या दरांनी विक्री होते. गेल्या आठवड्यात 160 ते 200 रुपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या निशिगंधासाठी आता 300 ते 400 रुपये मोजावे लागत आहे. तर, गेल्या काही दिवसांमध्ये प्रती किलो 50 ते 70 रुपयांपेक्षा कमी भावाने उपलब्ध होणाऱ्या झेंडूला देखील 200 ते 150 रुपये भाव मिळत असल्याचे ग्राहक वीणा जोशी यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गौरींचा उत्सव असल्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये फुलांची मागणी अजून वाढण्याची शक्‍यता आहे. पूजेसाठी लागणारी चमेली, जास्वंद व दूर्वा परिसरातील शेतकरी घेऊन येतात. जास्वंदीच्या किमतीत फारसा फरक पडलेला नाही. मात्र, लोकल सेवा बंद असल्याने अन्य फुलांची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम किमतीवर झाला आहे. 

- राजकुमार मोरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड फुलबाजार संघटना 

फुलांचे भाव (रुपयात प्रतिकिलो) 

 • झेंडू (पिवळा) - 200 ते 250  
 • झेंडू (ऑरेंज) - 150  
 • गुलछडी/रजनीगंधा - 500 ते 600  
 • पांढरी शेवंती - 160 ते 180 
 • लाल किंवा जांभळी शेवंती - 320  
 • डिस्को शेवंती - 300  
 • डच गुलाब - 100 ते 150  
 • साधा गुलाब जुडी - 30 
 • मोगरा - 600  
 • चमेली - 800 ते 1000  
 • जरबेरा - 50 
 • जास्वंद - 20 
 • दूर्वा मोठी जुडी - 30  
 • चाफा - 300 
 • शोभेची पाने - 30 ते 80 
loading image
go to top