

Pimpri Students Face Hunger Due to LPG Shortage
sakal
पिंपरी: शहरातील खानावळचालकांना व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने परिस्थिती गंभीर बनत आहे. अनेकांना सेवा अर्धवट सुरू ठेवणे भाग पडले आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर पाच ते साडेपाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले असून काही ठिकाणी यापेक्षा जास्त मूल्य मोजावे लागत असल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी, बहुतांश विद्यार्थ्यांना दिवसातून एकदाच दोन पोळ्या आणि एका भाजीवरच जेवण भागवावे लागत आहे.