
Urban Design Gone Wrong
Sakal
पिंपरी : नागरिकांना सुरक्षित चालता यावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून शहरात ‘अर्बन स्ट्रीट डिझाइन’नुसार प्रशस्त पदपथ विकसित करण्यात आले. मात्र, आता ठिकठिकाणी अनधिकृत टपऱ्या थाटण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी तर संपूर्ण पदपथच विक्रेत्यांनी बळकावले आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने रस्ते अरुंद होत आहेत. त्यामुळे इतका खर्च नेमका कोणासाठी केला? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.