Pimpri : स्पर्धकांना रायगड किल्ल्याचे मोफत दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raigad

स्पर्धकांना रायगड किल्ल्याचे मोफत दर्शन

वडगाव मावळ : येथील शिवराज ग्रुपने दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत मोठ्या गटात संकल्प लोहोट ग्रुपने तर लहान गटात प्रसाद काकडे ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना रायगड किल्ल्याची मोफत सहल घडविण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभ गडावरच झाला.

स्पर्धचे हे दहावे वर्ष होते. यंदाच्या स्पर्धेत एकूण १५० स्पर्धकांनी सहभाग घेत विविध ४० किल्ले बनवले होते. प्रा.अनिल कोद्रे व व्याख्याते विवेक गुरव यांनी परीक्षण केले. बाळ गोपाळांनी रायगडावरील ऐतिहासिक स्थळांची माहिती करुन घेतली. महा दरवाजा, हिरकणी बुरुज, गंगासागर तलाव, राणी महाल, राजवाडा, राजसदर, नगारखाना, अष्ट प्रधान मंडळाचे वाडे, बाजारपेठ, टकमक टोक, जगदिश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज समाधी आदी ठिकाणांना त्यांनी भेट दिली. समाधी स्थळावर स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ झाला. जिजा तुषार वहिले हिने शिववंदना सादर केली. श्रावणी मनोहर येवले हिने पोवडा सादर करुन, उपस्थितांची मने जिंकली.

मोठ्या गटात संकल्प लोहोट व ग्रुपने प्रथम, विश्लेश काळडोके व ग्रुपने द्वितीय तर छत्रपती संभाजी महाराज नगर ग्रुपने तिसरा क्रमांक पटकावला. लहान गटात प्रसाद काकडे व ग्रुपने प्रथम, हर्षल पगडे व ग्रुपने द्वितीय तर आदित्य कुंभार ग्रुप व तन्मय गव्हाणे याने तिसरा क्रमांक पटकावला. सुहास विनोदे यांनी सूत्रसंचालन केले. शिवराज ग्रुपचे संस्थापक अक्षय वायकर यांनी आभार मानले. अध्यक्ष बाळासाहेब तुमकर, कार्याध्यक्ष भाऊसाहेब ढोरे, सचिव सतिश ढोरे, कार्यक्रम प्रमुख रोहित गिरमे, खजिनदार तुषार वहिले, नवनाथ शेळके, सोनू पिंजण, विश्वजित गुरव, तुषार हुलावळे आदी उपस्थित होते.

loading image
go to top