भोसरीत प्रेमप्रकरणातून मित्रावर कटरने वार 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 January 2021

शुक्रवारी (ता.1) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास जखमी अभिषेक आणि त्याचा आरोपी मित्र किरण हे दोघेजण अभिषेक याच्या दुचाकीवरून भोसरी एमआयडीसीतील इंद्रायणीनगरकडून बालाजीनगरकडे जात होते. त्यावेळी प्रेमसंबंधाच्या कारणावरून किरण याने अभिषेक याचा कटरने गळा कापला.

पिंपरी : प्रेमसंबंधाच्या कारणावरून एकाने मित्रावर प्राणघातक हल्ला केला. गळ्यावर कटरने वार केल्याने मित्र गंभीर झाल्याची घटना भोसरी येथे घडली. 

अभिषेक ऊर्फ आकाश मधूकर कांबळे (वय 26, रा. पावर हाऊस जवळ, बालाजीनगर झोपडपटटी, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर किरण शिवाजी थोरात (वय 23, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभम मधूकर कांबळे (वय 20, रा.बालाजीनगर झोपडपटटी, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

थांबा! हेल्मेट घाला, प्रवासाला निघा; कऱ्हाड पोलिसांचे आहे लक्ष

शुक्रवारी (ता.1) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास जखमी अभिषेक आणि त्याचा आरोपी मित्र किरण हे दोघेजण अभिषेक याच्या दुचाकीवरून भोसरी एमआयडीसीतील इंद्रायणीनगरकडून बालाजीनगरकडे जात होते. त्यावेळी प्रेमसंबंधाच्या कारणावरून किरण याने अभिषेक याचा कटरने गळा कापला. यामध्ये अभिषेक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी किरण याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.  

पुणेकरांनो, फक्त 66 शाळाच सोमवारपासून सुरू होणार!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friend attacked by Cutter on neck due to love affairs in Bhosari