esakal | पुणेकरांनो, फक्त 66 शाळाच सोमवारपासून सुरू होणार!
sakal

बोलून बातमी शोधा

School

- महापालिकेकडून 529 पैकी 232 शाळांची तपासणी पूर्ण
- कोरोना चाचणीचा अहवाल सादर न केल्याने शाळांना परवानगी नाही

पुणेकरांनो, फक्त 66 शाळाच सोमवारपासून सुरू होणार!

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : तब्बल नऊ महिन्यांनंतर शहरातील सर्वच शाळांमधील घंटा सोमवारी (ता.4) वाजेल, अशी अपेक्षा होती. मात्र, महापालिकेकडून शहरातील सर्व शाळांची तपासणी होऊ शकली नाही. तसेच, शिक्षकांचा कोरोना चाचणीचा अहवालही शिक्षण विभागाला सादर न झाल्याने अनेक शाळांचे टाळे कायम राहणार आहे. पहिल्या दिवशी महापालिकेच्या 44 आणि खासगी 22 अशा 66 शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची मान्यता दिली आहे. राज्यभरातील शाळा सुरू झाल्या, पण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. यापूर्वी दोन वेळा शाळा सुरू करण्याचा मुहूर्त पुढे ढकलावा लागला. मात्र, तिसऱ्या वेळेस महापालिका प्रशासन 4 जानेवारीपासून शहरातील शाळा सुरू करण्यावर ठाम राहिले आहे.

पधारो म्हारे देस; उजनी धरण परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमण​

शाळा सुरू करताना पालकांचे संमतीपत्र, शाळांनी केलेल्या उपाययोजना हा महत्वाचा भाग होता. महापालिकेच्या शाळेसह खासगी शाळांमधून पालकांकडून संमतीपत्र घेण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. शाळांमध्ये सॅनिटायझेशन, थर्मल गन, ऑक्‍सीमिटर, वर्गामधील बसण्याची व्यवस्था याचे नियोजन झाले आहे. पण शिक्षकांच्या कोरोनाच तपासणीचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्याने शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्या पथकामार्फत शाळांची तपासणी सुरू आहे. रविवारी (ता. 4) दुपारपर्यंत शहरताली 529 पैकी 232 शाळांची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये महापालिकेच्या 44 आणि खासगी 188 शाळा आहेत. त्यापैकी महापालिकेच्या 100 टक्के आणि 22 खासगी शाळांना सोमवारपासून वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले.

तुम्ही स्वतः कमी करू शकता कार्बन उत्सर्जन; पुण्यातील बाप-लेकीनं तयार केलं ऍप​

प्रमाण वाढण्यास एक आठवडा जाणार
शहरात इयत्ता 9वी ते 12 पर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यात बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळा असल्याने त्यांना गेल्या आठवड्यात नाताळाची सुट्टी असल्याने शाळा बंद होत्या. त्यामुळे मनपाच्या पथकास तेथे जाऊन तपासणी करता आलेली नाही. आता शाळा उघडल्याने त्यांची तपासणी होईल. तसेच शिक्षकांचे कोरोना तपासणीचे अहवाल सादर होतील. त्यामुळे येत्या आठवड्याभरात शहरातील अनेक शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेमर्ससाठी खुशखबरी! २६ जानेवारीला येणार पब्जीचा देशी अवतार FAU-G​

23 हजार पालकांनी दिले संमतीपत्र
विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांना संमतिपत्र सादर करणे अनिवार्य आहे. आत्तापर्यंत 23 हजार 220 पालकांनी संमतीपत्र दिले आहे. तर 2 हजार 213 शिक्षकांनी व 842 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणीचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये 13 शिक्षक आणि 7 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image