Video : दैव बलवत्तर, पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला मित्राने असे वाचवले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी आलेला तरुण वाहून गेला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून त्याच्या मित्राने वेळीच धाव घेतल्याने त्याचे प्राण वाचले.

पिंपरी : वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी आलेला तरुण वाहून गेला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून त्याच्या मित्राने वेळीच धाव घेतल्याने त्याचे प्राण वाचले. ही घटना शुक्रवारी (ता. 21) सकाळी अकराच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमधील रावेत बंधाऱ्याजवळ घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मावळात जोरदार पाऊस झाल्याने पवना नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. रावेत बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे. दरम्यान, परिसरातील काही तरुण याठिकाणी पोहण्यासाठी येत असतात. अशाचप्रकारे शुक्रवारी सकाळी दोन तरुण येथे पोहण्यासाठी आले होते. पोहत असताना वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांमधील एक तरुण पाण्यात वाहत गेला. पाण्याचा इतका जोरात प्रवाह होता, की हा तरुण बंधारा ओलांडून पाण्यासोबतच दुसऱ्या बाजूला पडला. पाण्यासोबत वाहताना त्याने छोट्या झाडाची फांदी पकडली. भेदरलेल्या अवस्थेत त्याने मदतीसाठी आवाज दिला. त्यावेळी त्याच्यासोबतच्या मित्राने त्याठिकाणी धाव घेत त्याच्या हाताला धरून त्याला बाहेर खेचले. वाहत्या पाण्यासोबत दगडावर आपटल्याने तसेच, झाडाझुडपांत अडकल्याने त्याच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. 

जिवावर बेतणारे धाडस 

वाहत्या पाण्यात उतरू नये, असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. जिवावर बेतणारे धाडस केल्याने अनेकदा दुर्घटना घडत असल्याचे समोर येते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friend save youth life when he swim in ravet bund