Inspirational Journey : महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या श्रावणी टोणगेने ८० लाखांची शिष्यवृत्ती मिळवत जर्मनीतील नामांकित युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला आहे.
पिंपळे गुरव : कासारवाडीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील श्रावणी टोणगेने महापालिकेच्या शाळेत शिकताना उच्च शिक्षणाचा ध्यास घेतला. त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करीत तिने जर्मनीतील प्रतिष्ठेच्या महाविद्यालयात शंभर टक्के शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळविला.