esakal | लोणावळ्यात पर्यटकांची विकेंडला फुल्ल गर्दी!
sakal

बोलून बातमी शोधा

Full weekend crowd of tourists in Lonavala

राज्य सरकारने प्रवासासाठी 'ई पास'ची अट शिथिल केली आहे. हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. कोरोना संसर्गाचा धोका कायम असताना हौस, मजा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने लोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी पहावयास मिळत आहे.

लोणावळ्यात पर्यटकांची विकेंडला फुल्ल गर्दी!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लोणावळा : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जवळपास आठ महीने वैतागलेले पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. विकेंडला पर्यटकांनी गर्दी केल्याने लोणावळा, खंडाळा फुल्ल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारने प्रवासासाठी 'ई पास'ची अट शिथिल केली आहे. हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. कोरोना संसर्गाचा धोका कायम असताना हौस, मजा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने लोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी पहावयास मिळत आहे. शहरातील सर्व रिसॉर्टस, हाॅटेल्स, बंगले जवळपास हाऊस फुल्ल आहेत. त्यामुळे कोरोनाचा भीती नाहीशी झाल्याचे चित्र होते.

लोणावळ्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने व्यवसायावर अवलंबून आहे कोविङ-१९ पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळे, हॉटेल्स, रिसाॅर्टंस गेले सहा महीने बंद आहे. चिक्की उत्पादक, लहान-मोठे विक्रेते, टुरिस्ट व्यवसायिकांवर सक्रांत आली, मंदीचे सावट असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते सहा महीन्यांनतर दुकाने खुली झाली. त्यात पर्यटकांची वर्दळ वाढल्याने येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.बोरघाटात, राजमाची पॉईंट, लायन्स पॉईंट,पवना परिसरात निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. प्रामुख्याने मुंबई, गुजरात येथील पर्यटकांचा अधिक भरणा आहे.

डीएसके प्रकरण : फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट कोर्टात दाखल करा; वकिलांनी केली मागणी

पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवर चांगलाच ताण आला होता. द्रुतगती मार्गावर बोरघाटात, पुणे-मुंबई महामार्गावर, महावीर चौक, वरसोली टोलनाक्यावर वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या.