esakal | Pimpri : अकरावीसाठी कॉलेज कोटा ‘मॅनेज’
sakal

बोलून बातमी शोधा

fyjc

Pimpri : अकरावीसाठी कॉलेज कोटा ‘मॅनेज’

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सध्या शहरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, अनेकांना ‘पहिल्या गुणवत्ता यादीत’ पसंतीचे कॉलेज मिळाले नाही. परिणामी अनेक कनिष्ठ महाविद्यालयांकडून वरकमाईसाठी ‘कॉलेजचा इनहाउस कोटा’ पूर्ण झाला आहे, असे सांगत ‘मॅनेजमेंट कोट्या’तून प्रवेश घ्यायला सांगण्यात येत आहे. नेमका प्रवेश घ्यावा की नाही? अशा संभ्रमावस्थेत पालक सापडले आहेत.

शहरात ८० कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या वर्षी शहराचा दहावीचा एकूण निकाल ९९.८६ टक्के इतका लागला आहे. १६ हजार ४५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. क्रीडागुणांबरोबरच कलागुणांचे अतिरिक्त गुण मिळाल्याने अकरावी प्रवेशाची स्पर्धा यंदा अधिक तीव्र झाली आहे. मोठ्या संख्येने बहुतांश मुलांना ९० टक्क्याहून अधिक गुण मिळाले आहे. परिणामी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस पहायला मिळत आहे. सध्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा पसंती क्रमांक दिला आहे. मात्र, पहिल्या यादीत बहुतांशी मुलांना पसंतीचे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेले नाही.

हेही वाचा: कोहलीबद्दल कसोटी मालिका सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बोलला रूट

अजूनही विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली नसली, तरी काही महाविद्यालयांनी अकरावीसाठी २५ ते ३५ हजार रूपये मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेशाची रक्कम दबक्या आवाजात जाहीर केली आहे. तेवढे ‘‘पैसे भरा आणि मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घ्या’’ असे पालकांना सांगण्यात येत आहे. गुणवत्तेच्या आधारावर ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असून, अनुदानित माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणत्याही वर्गाच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊ नये, अशा सूचनाही दिल्या आहेत. तरीही अधिकचे पैसे कमविण्यासाठी महाविद्यालयांकडून शक्कल लढविण्यात येत असल्याने पालक वैतागले आहेत.

हेही वाचा: 'मुंबई इंडियन्स'चा धडाकेबाज फलंदाज गेला राजस्थानच्या संघात

ही आहेत उदाहरणे

प्रकरण : १

‘‘आई एकटीच कमवती आहे असून, भावाकडे असते. लॉकडाउनच्या काळात विद्यार्थिनीच्या भावाच्या डोक्‍यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र, त्या विद्यार्थिनीला ८५ टक्के मिळाले आहेत. चिंचवड स्टेशनमधील एका ज्युनिअर कनिष्ठ महाविद्यालयाने मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी वार्षिक शुल्क ३४ हजार ५०० भरायला सांगितले आहेत.’’

प्रकरण : २

‘‘एका विद्यार्थिनी ९० टक्के मिळाले आहेत. तिने विविध कनिष्ठ महाविद्यालयाच्या नावांनी ऑनलाइन फॉर्म भरले. तिने एमएसडब्ल्यूसाठी वाकडमधील एका कॉम्प्युटर सायन्सच्या महाविद्यालयात चौकशी केली असता, ‘ऍडमिशन फुल' झाल्याचे सांगत मॅनेजमेंट कोट्यातील जागा रिक्त आहेत, असे सांगितले. निगडीतील एका महाविद्यालयाने सांगितले की ‘‘दुसरी यादी जाहीर झाली नाही’ असे सांगितले तर चिंचवडच्या कनिष्ठ महाविद्यालयाने म्हटले की जागा भरल्या आहेत. मॅनेजमेंट कोट्यातून २५ हजार रुपये भरून ऍडमिशन करा.’’

‘‘विद्यार्थ्यांनी घाबरू नये, प्रत्येकाला प्रवेश मिळेल. लवकरच दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतरच महाविद्यालयांच्या सूचनेनुसार प्रवेश होणार आहेत. पालकांनी प्रवेश करण्याची घाई करू नये.’’

- मीना शेंडकर, सहायक शिक्षण संचालक

हेही वाचा: सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस - IMD

भाग १ आणि २ नोंदणी करू शकता

अकरावी ऑनलाईन प्रक्रियेला १७ ऑगस्‍टपासून सुरुवात झालेली आहे. ज्या मुलांनी अकरावी प्रवेशासाठीचा भाग एक अर्ज आणि भाग दोन अर्ज भरले नाहीत. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा केंद्रीय समितीने नोंदणी करण्याची संधी उपलब्ध केली आहे. त्यांनी ३ सप्‍टेंबरपर्यत आपापल्या शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ता. ४ ते ५ सप्टेंबर दरम्यान, संकेतस्थळावर दुसरी प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे.

loading image
go to top