
पिंपरी : लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा लाडका असणाऱ्या गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी घरोघरी दिसून येत आहे. दहा दिवस ज्याची पूजा करायची, अशा गणेशाची मूर्ती घेण्यासाठी बाजारपेठांमध्येही भक्त गर्दी करत आहेत. सुंदर, सुबक आणि हवी तशी मूर्ती घरी न्यावी, यासाठी आगाऊ नोंदणीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. मागणी पाहता शहरभर सध्या गणपती मूर्तींचे स्टॉल दिसून येत आहेत.