
टाकवे बुद्रूक : महाराष्ट्रात उत्साहाने साजरा होणारा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, मावळ भागातील शहरी व ग्रामीण भागांत मूर्तिकारांची लगबग शिगेला पोहोचली आहे. गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याने मूर्तींना अंतिम रूप देण्याचं काम दिवस-रात्र सुरू आहे.