
पिंपरी : शहरातील गणेशोत्सव उत्साहात व शांततेत व्हावा. नागरिकांची सुरक्षा कायम राहावी, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने तयारी पूर्ण केली आहे. उत्सव काळात सुमारे तीन हजार पोलिस सज्ज असतील, तसेच मागील काही दिवसांत प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली.