
पिंपरी : मागील दोन वर्षांत गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर वाढला आहे. ‘डीजे’चाही वापर कमी झाला असला, तरी गेल्या वर्षी लेझरचा मारा जास्त झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे यंदा ‘लेझरमुक्त’ गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मंडळांना केले.