
भोसरी : यंदा गणपती विसर्जनासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र विसर्जन हौदाची निर्मिती करण्यात येणार आहे. हौदात साचणाऱ्या शाडू मातीचा पुनर्वापरही करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे वाटचाल होणार आहे. येत्या बुधवारी (ता. २७) श्री गणेशाची सर्वत्र भक्तिभावे प्रतिष्ठापना होणार आहे.