पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी व दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले. ही कारवाई दिघी येथे करण्यात आली. 

पिंपरी - पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी व दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले. ही कारवाई दिघी येथे करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राहुल रमेश चव्हाण (वय 19, रा. कॉलनी क्र.2, भारतमातानगर, दिघी), शेखर संभाजी जाधव (वय 21, रा. मु.पो. मोघा, ता. उदगीर, जि.लातूर), करण गुरूनाथ राठोड (वय 19, रा. दिघी रोड, भोसरी), कृष्णा संजय तांगतोडे (वय 20, रा. पुणे, मूळ-नाशिक) यांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. दिघीतील पोलाईट पॅनोरमा इमारतीजवळील पाण्याच्या टाकीच्याबाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात काही थांबले असून त्यांच्याकडे हत्यारे असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. तर तीनजण पसार झाले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे कोयता व सुरा आढळला. त्यांच्याकडील दुचाकीच्या नंबरप्लेटला चिखल लावलेला होता.

सोन्याच्या भिशीच्या नावाखाली फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार गजाआड

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता मोशीतील काजळे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी एकत्र जमल्याचे त्यांनी सांगितले. दिघी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

शेखर जाधव याच्यावर लातूरमधील उदगीर पोलिस ठाण्यात तीन तर भोसरी ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. कृष्णा तांगतोडे याच्यावर नाशिकमधील मनमाड, इंदिरानगर व सिन्नर ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल असून आरोपी करण राठोड याच्यावरही भोसरी ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang arrested in preparation for robbery at petrol pump